शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इन्शुरन्स मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी चौघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:21 IST

सातारा : इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाºया ट्रक मालकासह तीन भंगार व्यावसायिकांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून,

सातारा : इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाºया ट्रक मालकासह तीन भंगार व्यावसायिकांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक ट्रक आणि कार असा सुमारे २३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

आसिफ रफिक पठाण (वय २९, रा. राजोपाध्येनगर, ता. करवीर जि. कोल्हापूर), जमीर इब्राहिम हारचीकर (४०, रा. जवाहरनगर, सिरत मौहल्ला, कोल्हापूर), अन्वर दाऊद कच्छी (५६, रा. विश्वकर्मा कॉम्प्लेक्स, संभाजीगनर, कोल्हापूर), अतुल सुभाषचंद्र साळुंखे (३३, रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली, सातारा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.येथील शिवराज तिकाटणेजवळ रस्त्याकडे ट्रक उभा करून दोघेजण संशयितरीत्या उभे राहिले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांच्याजवळील ट्रक भंगारात विकण्यासाठी आणला असल्याची माहिती पोलिसांना दिली. हा ट्रक त्यांनी कोल्हापूर येथील भंगार व्यावसायिकाकडून खरेदी केला असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कोल्हापुरातील भंगार व्यावसायिकाला अटक केली. त्यालाही पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सारा प्रकार उघड केला.

ट्रक मालक अतुल साळुंखे याने स्वत: चा ट्रक कोल्हापुरातील भंगार व्यावसायिकाल विकल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रक चोरीस गेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद केली होती.त्यानंतर त्याने विम्याची रक्कमही कंपनीकडून वसूल केली होती. एक गुन्हा पचल्यानंतर या टोळीने इस्लामपूर, सांगली म्हापसा (गोवा) तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यामध्ये ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी दाखल केल्या असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने करून या टोळीतील चौघांनाही अटक केली.आठ गुन्हे उघडकीससातारा जिल्ह्यात ट्रक चोरीचे ६ गुन्हे, सांगली जिल्ह्यात १, गोवा राज्यात कार चोरीचा एक असे एकूण ८ गुन्हे या टोळीने केल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर